प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पोलिसांच्या नियोजनबद्ध कामामुळे रथोत्सवात वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि चोरीच्या घटना टाळण्यात यश : नागरिकांकडून कौतुकाची थाप

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावचा प्रसिद्ध श्री गणरायाच्या रथोत्सव जगप्रसिद्ध आहे. लाखो भाविकांची गर्दी आणि वाहनांची रेलचेल यामुळे नेहमी वाहतुकीचा फज्जा आणि चोरट्यांचा डल्ला अशी परिस्थिती असते परंतु यावर्षी तासगाव पोलिसांच्या नियोजनबद्ध कामामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात यश मिळाले. तर बाहेरून येणाऱ्या चोरट्यांना ट्रॅप लावून आगोदच पकडल्यामुळे चोरीच्या घटना टाळण्यात यश मिळाले आहे. याबद्दल तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडें यांच्यासह कर्मचाऱ्यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडें यांनी दिलेल्या माहिती नुसार श्री गणरायची रथयात्रा तब्बल दोन वर्षानंतर भरणार होती, त्यामुळे रथ यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार होती. रथ यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांना लुटण्यासाठी, चोऱ्या करण्याच्या उद्देशाने असंख्य चोरटे परजिल्ह्यातून या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र ‘नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता यंदाची रथ यात्रा उत्साहात पार पाडायची ‘असा संकल्प करून तासगाव पोलीस मैदानात उतरले होते. श्री गणेशाच्या मंदिराकडे भाविक दर्शनासाठी गर्दी करतं होते, तेव्हा पोलीस डोळ्यात तेल घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिश्रम घेत होते. गणरायाच्या रूपात पोलीस चोरट्यांना विलक्षण नजरेने हेरून गर्दी तुन बाहेर काढत होते. पोलिसांची नजर पडताच चोरटे आणखी गर्दीत घुसत होते. मात्र पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नियोजनातुन लावलेल्या ट्रॅप मधून अनेक चोरटे तासगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकले. चोरट्यांना पकडण्यासाठी दोन विशेष पंटर नियुक्त करण्यात आले होते. एवढ्या मोठ्या रथ यात्रेत एखादी दुसरी चोरीची घटना वगळता कुठेही चोरीची घटना घडली नाही. तासगाव पोलिसांच्या या सतर्क तेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
वाहतूकीचे नियोजन अगदी तंतोतंत करण्यात आले होते. विटा आटपाडी कडून येणारी वाहने चिंचणी मार्गे कॉलेजकडे वळविली होती तर सांगली कडून येणारी वाहने ज्योतिबा चौक मार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे कुठेही वाहनांच्या रांगा लागल्या नाहीत. वाहतूक व्यवस्था आणि चोरट्यांचा बंदोबस्त ठेवण्यात पोलिसांना यश आले. याबद्दल तासगाव पोलिसाच्या कार्याचे कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.