प्रतिष्ठा न्यूज

सौ. विजयमाला पतंगराव कदम वाचनालयात वि. स. खांडेकर स्मृतिदिन साजरा

प्रतिष्ठा न्यूज
विटा प्रतिनिधी : वि. स. खांडेकर हे मराठी भाषेतील थोर साहित्यिक होते. त्यांच्या साहित्यात प्रामाणिकपणा, शौर्य, कृतज्ञता बुद्धी , तत्त्वनिष्ठा, निष्कलंक चारित्र्य , जीवमात्रावर प्रेम, निसर्गावर माया, विद्या, सौंदर्य , तेजस्विता , प्रसन्नता या मानवी भावना प्रखरतेने लिहिल्या गेल्या. त्यांचे सर्व साहित्य आजरामर साहित्य आहे. ययाती कादंबरी अक्षर वांग्मय आहे. मराठी भाषेला त्यांनी पाहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला. असे विचार साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी मांडले. ते सौ विजयमाला पतंगराव कदम वाचनालयात साहित्यिक वि. स. खांडेकर यांची ४६ वी पुण्यतिथी च्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवप्रताप हंबीरे हे होते. ते आपल्या भाषणात म्हणाले, खांडेकरांच्या साहित्याने मराठी वाचकांना दिशा दिली. तरुणांना काय वाचावे हे शिकवले. खांडेकर फार लोकप्रिय साहित्यिक होते. त्यांची पुस्तके भारतातील सर्व भाषांत भाषांतर झाली. ते विचारवंत साहित्यिक होते. सौ वैशाली कोळेकर यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. पाहुण्यांच्या हस्ते खांडेकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू गारोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.