सांगली महापालिकेच्या 75 सफाई कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महापालिकेच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव व हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज माननीय महापौर दिग्विजय सूर्यवंशी महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे उपायुक्त चंद्रकांत आडके सन्माननीय सदस्य जगन्नाथ थोकळे मनगु आबा सरगर यांचे हस्ते महापालिकेच्या 75 सफाई कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नूतन महापालिका आयुक्त सुनील पवार म्हणाले की मी नेहमी माझ्या सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य सैनिक म्हणून संबोधतो कारण सैनिक ज्याप्रमाणे सीमेवर देशाचे रक्षण करतात त्याचप्रमाणे आमचे सफाई कर्मचारी हे नागरिकांचे आरोग्याची रक्षण करतात. यावेळी बोलताना महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले कोरोना कालावधीमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे सन्माननीय सदस्य जगन्नाथ ठोकळे यांनी मनोगत व्यक्त केले आभार उपायुक्त चंद्रकांत आडके यानी मानले सूत्रसंचालन डॉक्टर रवींद्र ताटे यांनी केले सहाय्यक आयुक्त नितीन शिंदे सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते अधीक्षक काका हलवाई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.