प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादीचा तो बडा नेता कोण? घोरपडे गटाच्या आरोपांनी चर्चेला उधाण

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गेली दहा वर्षे तासगाव कवठे महांकाळ मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादीची अघोषित युती आहे.लोकसभेला तुमचा खासदार आणि विधानसभेला आमचा आमदार म्हणत पक्षीय राजकारण व विचारधारा बासनात गुंडाळून स्वतःच्या सोयीचे राजकारण आबा काका गटाकडून सुरू होते.अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाच्या गावातच भाजप राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता आहे.त्यामुळे याचा मोठा फटका अजितराव घोरपडे व विशाल पाटील यांना यापूर्वी बसला आहे.जिल्ह्यात खासदार संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील यांची लढत चुरशीने  झालेली असताना,संजय काकांच्या होम ग्राउंडवर आमचाच आमदार आमचा खासदारच्या नावाखाली पुन्हा सेटलमेंटचा खेळ झाल्याचा आरोप अजितराव घोरपडे समर्थक पांडुरंग पाटील यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा  राष्ट्रवादीचा बडा नेता कोण?या बरोबरच तासगाव कवठे महांकाळ मधील सेटलमेंटच्या राजकारणाच्या  चर्चेला उधान आले आहे.गेल्या वर्षभरा पासून प्रभाकर पाटील यांचे नाव भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभेसाठी प्रमोट केल्यानंतर राष्ट्रवादी व भाजपमध्ये संघर्षाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती.त्यामुळे आमचाच आमदार व आमचाच खासदार या संकल्पनेला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात कवठे महांकाळ तालुक्यात घोरपडे गट व आमदार गट एकत्र असताना संजय काकांना झालेले मतदान हे विचार करायला लावणारे आहे,याची उलट सुलट चर्चा सुरू असतानाच मतदार संघातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने भाजप उमेदवाराला रसद पुरवल्यानेच विशाल पाटील यांना मतदारसंघात मताधिक्य कमी झाल्याचा दावा अजितराव घोरपडे गटाचे नेते पांडुरंग पाटील यांनी केला आहे.त्यामुळे तासगाव कवठे महांकाळ मधील सेटलमेंटचे राजकारण अजूनही सुरू असल्याच्या चर्चांना मतदारसंघात उधान आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.