प्रतिष्ठा न्यूज

एल.के.जोशी यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात.. मान्यवरांकडून भावी वाटचालीस शुभेच्छा…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील सांगली अर्बन बँकेचे सहा.शाखाधिकारी लक्ष्मण केशव जोशी तथा एल के यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी बोलताना सेवानिवृत्ती समारंभा दिवशी जमलेली गर्दी आणि आयुष्यात जोडलेली माणसं हीच कामाची खरी पोच पावती आहे, एल.के.यांनी नोकरीमध्ये ओढून ताडून काम न करता जबाबदारी व प्रामाणिकपणाने काम केले असे प्रतिपादन श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तासगावचे व्हा.चेअरमन सुनील जोशी यांनी केले तर,आपल्या आजपर्यंतच्या बँकिंग क्षेत्रातील कामाच्या अनुभवाचा उपयोग पतसंस्थेस व्हावा असे मत चेअरमन जगदीश कालगावकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील सदस्य म्हणून एल.के. जोशी परिचित आहेत.संघाच्या वतीने झालेल्या रामशिला कार्यक्रमामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता.३ ऑगस्ट १९८९ हा बँकेतील नोकरीचा पहिला दिवस,सांगली अर्बन बँकेमध्ये ३५ वर्षाचा सेवा काल त्यांनी पूर्ण केला. त्यांनी तासगाव,भिलवडी,विटा,मिरज, माजलगाव (विदर्भ), कुडूवाडी,पुणे येथील शाखांमध्ये आपल्या कामाची छाप पाडली.त्यांनी दिलेल्या सेवेमुळे ते ग्राहकांच्या पसंतीस उतरले. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या संचालक पदी त्यांची नुकतीच निवड झाली आहे.श्री.जोशी उत्तम निवेदक म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या उत्तम निवेदनातून रसिकांची मने जिंकली आहेत.यावेळी मान्यवरांकडून त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.