प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समिती अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करा विशेष लेखापरीक्षक पैलवान… प्रशासनाने हालचाल न केल्यास मनसे स्टाईल दणका देणार : अमोल काळे..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती, तासगांवचे १ एप्रिल २०२० ते.३१ मार्च २०२१अखेरच्या लेखा परीक्षणाअंती निदर्शनास आलेल्या अपहाराबाबत जिल्हा सरकारी अभियोक्ता सांगली यांच्याकडून कायदेशीर अभिप्राय घेवून गुन्हा नोंद
करण्यात यावा असा अहवाल विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी  जिल्हा उपनिबंधक यांना पाठवला आहे.या अपहार प्रकरणी मनसे नेते अमोल काळे हे गेली २ वर्षे पाठपुरावा करत आहेत.विशेष लेखापरीक्षक यांनी दिलेल्या अहवालात सांगितले की आम्ही आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावचे १ एप्रिल २०२० ते. ३१ मार्च २०२१ या मुदतीचे लेखापरिक्षण पूर्ण कले असून,त्याचा लेखापरिक्षणचा अहवाल दि.०९/०१/२०२४ रोजी सादर केला आहे.सदरच्या लेखा परीक्षणाअंती निदर्शनास आलेल्या अपहाराचा विशेष अहवाल या सोबत सादर करीत आहे.सदर बाजास समितीमध्ये झालेला अपहार हा विस्तारीत बेदाणा शेतीमाल बांधकामाच्या अनुषंगाने झाला आहे.सदरचा अपहार हा अन्य त्रयस्त मुल्यांकनकार यांचे तपासणी अहवालानंतर निदर्शनास आलेला आहे.अपहाराचे स्वरुप पाहता याबाबतीत मा.जिल्हा सरकारी अभियोक्ता सांगली यांचे कायदेशीर अभिप्राय घेणे आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे तरी मा.जिल्हा सरकारी अभियोक्ता,सांगली यांचेकडून कायदेशीर कायदेशीर अभिप्राय घेवून मला गुन्हा नोंदीसाठी प्राधिकृत करावे,असा अहवाल विशेष लेखापरीक्षक अनिल पैलवान यांनी जिल्हा उपनिबंधक यांना पाठवला आहे.
मनसे स्टाईलचा दणका देणार : काळे 
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा करून या भ्रष्टाचाराचा भांडाफोड आम्ही करत आहोत,मात्र ठेकेदार व अधिकारी दुय्यम निबंध,जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीचे सचिव यांना हाताशी धरून कागदी घोडे नाचवत आहेत.या प्रकरणात प्रशासनाने काही हालचाली न केल्यास त्यांना लवकरच दणका देणार आहे असे अमोल काळे यांनी सांगितले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.