प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत एनडीआरएफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्ती प्रसंगी बचाव प्रात्यक्षिक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सांगलीत एनडीआरएफच्या जवानांकडून नदीपात्रामध्ये आपत्ती प्रसंगी बचाव प्रात्यक्षिक करण्यात आली. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एनडीआरएफचे प्रमुख महेंद्रसिंग पुनिया यांच्या उपस्थितीत कृष्णा नदी पात्रामध्ये हे प्रात्यक्षिक संपन्न झाले. यामध्ये प्रत्यक्ष आपत्ती काळात नदीपात्रामध्ये किंवा पाण्याच्या प्रवाहामध्ये नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करायचा , यासाठी कोणकोणती घरगुती साधने वापरायची याची माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्ष नदीपात्रात जवानांनी उतरून आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपला बचाव कसा करू शकतो हे सर्वांना प्रात्यक्षिक अशा माध्यमातून दाखवून दिले. 16 जून पासून एनडीआरएफची टीम ही सांगलीमध्ये दाखल झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ
अशा संयुक्तरित्या विविध विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. आणि आज प्रत्यक्ष नदीपात्रामध्ये या सर्व अधिकारी कर्मचारी यांना एनडीआरएफ करून आपत्ती काळातील बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. एनडीआरएफची टीम ही 30 ऑगस्टपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये असणार आहे . तसेच उद्यापासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार आहे. यदाकदाचित पूर परिस्थिती उद्भवली तर त्याला सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन , महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफ यंत्रणा ही सर्व यंत्रणे सहित सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि एनडीआरएफ पथक प्रमुख यांनी माध्यमांना सांगितले. या प्रात्यक्षिका वेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे , सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी, सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते , जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह महापालिका महसूल पोलीस 20 मंडळ यांचे अधिकारी आणि प्रशिक्षित कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.