प्रतिष्ठा न्यूज

माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत, महानगरपालिकेकडून नगरसेवक, पत्रकार व नागरिकासाठी आठवण उद्यान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आणि माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियानां तर्गत, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात हरित क्षेत्रे विकसित करण्यासाठी कुपवाड येथे नगरसेवक , पत्रकार व नागरिक यांच्यासाठी आठवण उद्यान विकसित करण्यात आला आहे. या आठवण उद्यानामध्ये 300 हून अधिक वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
या आठवण उद्यानाच्या वृक्ष लागवडीचा शुभारंभ महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या हस्ते रोपाला पाणी देत करण्यात आला. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे स्थानिक नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार जगन्नाथ ठोकळे, नगरसेविका सोनाली सागरे, उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक,कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर दीपक चव्हाण, पत्रकार दीपक कांबळे, विजय हुपरीकर, बाळासाहेब मलमे यानी वृक्षारोपण केले. यावेळी बागा विभागाचे गोगा शेख, सुनील कुंभार यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी 50 वृक्षांचे लागवड करण्यात आली. जैव विविधता जोपासण्यासाठी विविध फळ झाडे या ठिकाणी लावली जाणार आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.