प्रतिष्ठा न्यूज

महापालिकेच्या महिला कर्मचारी आणि नगरसेविकासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न : महिला नगरसेवक अधिकारी कर्मचाऱ्यांनी लुटला आनंद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिेकेच्या वर्धापन दिनानिमित्त महिला नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे प्रसिद्ध हास्य कलाकार व निवेदक वृषभ आकिवाटे यांच्या हास्यगंध हा कार्यक्रम आणि खेळ पैठणी कार्यक्रम संपन्न झाला. आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात वृषभ अकिवाटे यानी आपल्या हास्य विनोदाने सर्वांना खळखळून हसवले. या वेळी आयोजित कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या मनीषा पवार यानी पहिला , नगरसेविका सविता मदने यांनी दुसरा तर नगरसेविका अनारकली कुरणे यानी तिसऱ्या क्रमांकाच्या पैठणीचे मानकरी होण्याचा बहुमान पटकावला. संपूर्ण कार्यक्रमास उपायुक्त स्मृती पाटील, माजी महापौर संगीता खोत, नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका सविता मदने, अप्सरा वायदंडे , सोनाली सागरे याची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन सहायक आयुक्त उज्वला शिंदे आणि मंगल फाँडे यानी केले. या कार्यक्रमात महिला नगरसेविका आणि अधिकारी कर्मचारी यांनी
मनमुराद आनंद लुटला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.