प्रतिष्ठा न्यूज

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा- नांदेड येथील अनेक पत्रकार संघाची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/ वसंत सिरसाट
नांदेड : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या वर कार घालून हत्या करण्यात आली होती. अशा प्रकारे राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारावरील हल्ल्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद किनवट तालुका शाखेच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध करून काळ्याफिती लावून निषेध नोंदवला व या संदर्भात किनवटच्या तहसीलदार मा.डॉ.मृणाल जाधव यांना निवेदन देण्यात आले.
   यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष फुलाजी गरड पाटील, माजी नगराध्यक्ष के.मूर्ती, जेष्ठ पत्रकार किशनराव भोयर,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, किरण ठाकरे, अँड. विलास सूर्यवंशी, बालाजी सिरसाट आदी उपस्थित होते.
   अशीच मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकारीयांचे वतीने मुख्यमंत्री यांना केली आहे.
यावेळी परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, राम तरटे, डॉ.दिलीप शिंदे, कृष्णा उमरीकर,राजकुमार कोटलवार सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.
    तसेच मारतळा मराठी पत्रकार संघाने ही रायगड येथील घटनेचा तीव्र निषेध करून मयत पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. यावेळी अध्यक्ष- गणेशराव ढेपे, उत्तमराव हंबर्डे, संजय देशमुख, वसंत सिरसाट, बालाजी शिंदे, नागेश वडवळे, आदी पत्रकार उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.