प्रतिष्ठा न्यूज

डॉ. ग.गो.जाधव महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांना जयंती निमित्त अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : 2 ऑक्टोबर 2023 रोजी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पद्मश्री डॉ. जाधव महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त उपप्राचार्य डॉ. एस.एस. पानारी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले तसेच १ ऑक्टोबर रोजी “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत ग्रीन क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेमार्फत महाविद्यालय परिसरातील स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमास संस्था अध्यक्ष प्रा.सतिश देसाई व सचिव व प्र.प्राचार्य डॉ. व्ही.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळेस उपप्राचार्य व ग्रीन क्लब समन्वयक डॉ.एस.एस. पानारी, एनएसएस समन्वयक प्रा.ए.एस. कांबळे, प्रा. ए एस जमादार, प्रा.एच एस फरास,प्रा.ए. आर गावकर प्रा.एस.एस. घाटगे, प्रा.आर.आर. सरनोबत, प्रा.सौरभ देसाई आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.