प्रतिष्ठा न्यूज

एलईडी दिवे बसविणे झाले बंद तर प्रभागातील पोल वर कंदील तर बसवा : नगरसेविका सोनाली ताई सागरे

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका शहरांमधील जुने लाईट काढून नवीन एलईडी बसवण्याचा ठेका समुद्रा कंपनीला दिला आहे. सदर कंपनीचे प्रभाग क्रं ८ मधील काम पन्नास टक्के झाले आहे. उर्वरित पन्नास टक्के मध्ये मेंटेनेस अभावी दिवे ट्यूबलाईट बंद आहेत. महानगरपालिकेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता समुद्रा कंपनीने काम बंद ठेवले आहे, असे सांगतात. समुद्रा कंपनीचे प्रतिनिधी फोन उचलत नाहीत. यामुळे नागरिकांच्या रोशाला नगरसेवकांना सामोरे जावे लागते. वॉर्ड क्रं ८ मधील पन्नास टक्के भाग हा अंधारमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या अंधारमय भागामध्ये अवैध धंदे व चोऱ्या माऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिणामांची जबाबदारी प्रशासनाला कळावी व महानगरपालिकेला जाग यावी म्हणून नगरसेविका सोनाली ताई सागरे आज कंदील घेऊन महासभेत उपस्थित राहिल्या होत्या. त्यांच्यासोबत नगरसेवक राजेंद्र कुंभार व कल्पना कोळेकर उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.