प्रतिष्ठा न्यूज

तासगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयात ९ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगांव तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना यांचे संयुक्त विदयमाने दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी  दिवाणी व फौजदारी न्यायालय तासगांव येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे.सदर लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी सहभागी होवून कोर्ट केसेसची जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावीत,असे आवाहन दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती श्री.ओ. एम.माळी व अध्यक्ष बार असोशिएशन तासगांव श्री ए.जी.शिंदे यांनी केले आहे.यात दावपूर्व प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे,दिवाणी व फौजदारी प्रकरणे,बॅंकाची कर्ज प्रकरणे,दूरध्वनी,लाईट,पाणीपट्टी कर इत्यादी देयकाची विविध प्रकरणे  ठेवण्यात येणार आहेत.तरी याचा पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.