प्रतिष्ठा न्यूज

नांदेड मराठा समूहाच्या वतीने मराठा व्यावसायिक मेळावा: नीट & आयआयटी फौंडेशन मध्ये संपन्न

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : येथे दि.30 एप्रिल 2023 रोजी आयोजित मराठा समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या मेळाव्यात समाजाच्या प्रत्येक व्यवसायातील म्हणजे डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, आदींसह भाजीपाला विकणाऱ्या मराठा बांधवांची यावेळी मोठी उपस्थिती होती.
मराठा समाजासाठी तत्परतेने कार्य करणाऱ्या स्त्री पुरुष व मार्गदर्शक व्यक्तींचा यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले अनुभव विशद करून मार्गदर्शन केले.
प्रथम या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदेड मराठा सहमूहाचे अध्यक्ष-ऍडमीन- संतोष पाटील शिंदे म्हणाले की गर्दी पेक्षा दर्दी मराठा एकत्र आल्यावर क्रांती होऊ शकते आणि त्याचा पाया या मेळाव्यातुन सुरू करण्यात येत असून पुढे याचे रूपांतर मराठा उद्योग क्रांती मध्ये होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भास्कर थेटे, सतिश कुमार जाधव, कृष्णा शिंदे, कुणाल हंगरगे, प्रियंकाताई कैवारे, अमोल नलावडे, जगदीश जाधव, फोटोग्राफर- सुधाकर देशमुख ह्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश गाढे यांनी केले तर आभार विजय ताटे यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.