प्रतिष्ठा न्यूज

निमणी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या महिला प्रशिक्षण शिबिराचा समारोप

प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : निमणी ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील तरतुदीनुसार महिला व युवतींना प्रशिक्षण देणे या कार्यक्रमांतर्गत शत्रुंजय एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट,सांगली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला.
१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ५० महिलांना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देण्यात आले.
निमणीच्या सरपंच सौ रेखा रविंद्र पाटील यांच्या व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
यावेळी सौ.जयश्री शेळके,विद्या चौगुले,स्वाती सूर्यवंशी,प्रज्वला चौगुले, अंजली पाटील,पुनम पाटील,राणी शेळके,सीमा सुखदेव आदींनी मिळालेल्या प्रशिक्षणाचा खुप चांगला फायदा झाल्याचे सांगुन समाधान व्यक्त केले. यापुढेही असेच उपक्रम राबविण्यात यावेत अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
*निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. पाटील म्हणाले लोकसहभागा शिवाय शासनाच्या कोणत्याही योजना यशस्वी होऊ शकत नाहीत.महिलांनी स्वावलंबी व सक्षम होण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.त्यासाठी सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे*.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या संगिता चौगुले,वंदना गायकवाड,डाटा ऑपरेटर माधवी पवार,राजमानेसर उपस्थित होते.
शत्रूंजयच्या सौ.शोभा राजमाने,सौ. मनीषा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
*यावेळी बोलताना सौ.रेखा पाटील म्हणाल्या महिलांच्या साठी शासनाच्या अनेक योजना आहेत त्या सर्व महिलांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी महिलांनी घरकामातुन वेळ काढून एकत्र येणे आवश्यक आहे.ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या महिला ग्रामसभांना तसेच वेळोवेळी होणारया महिलांच्या बैठकांना जास्तीत जास्त महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन चर्चा, विचारविनिमय करणे आवश्यक आहे.*
या कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थी सुषमा साळुंखे,अंजली पाटील,विद्या चौगुले, भूमिका सुखदेव,मेघा चौगुले,प्रज्वला चौगुले,लक्ष्मी चौगुले,राधिका चौगुले, भाग्यश्री पाटील,सुधामती गायकवाड,भाग्यश्री पाटील,रेश्मा सुखदेव,लता शेळके,शोभा पवार, सीमा काळीबाग,गीता पाटील, अंकिता मोरे,अंजना पवार,अश्विनी शेळके,रोहिणी शेळके,माधुरी आडके, अर्चना स्वामी,स्वाती माने,सुप्रिया आडके,सारिका शेलार,सुनिता पाटील सायली मस्के,प्रियांका आडके,जयश्री शेळके,राणी शेळके,सुषमा वासुदेव, सुलोचना सूर्यवंशी,दिपाली पाटील, स्वाती पाटील,विद्या काळीबाग,प्रगती पाटील,प्रणिता पवार,हर्षदा पाटील, प्रणिता पवार,स्वाती सूर्यवंशी,पुनम कांबळे,विद्या सुखदेव,पुनम पाटील, विद्या पवार,विद्या पाटील अश्विनी चौगुले,प्रगती गायकवाड,अर्चना चव्हाण,पुनम शिंदे,सविता पाटील, अमृता पाटील,मनीषा आनंद आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.