प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील केंब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांची मिरज शहर पोलिस स्टेशनला शैक्षणिक भेट

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल आणि ज्यु. कॉलेज, मिरज या शाळेमधील इयत्ता 6 वी व 7 वी च्या विद्यार्थ्यांनी मिरज शहर पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट दिली तसेच तेथील कामकाजाविषयी माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक मा. गौतम सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यांना त्यांचा रोजचा दिनक्रम तसेच मोबाईलचा दुरूपयोग, 18 वर्षाखालील मुलांनी गाडी चालवू नये आणि चालविल्यास त्याचा काय परिणाम होतो हे समजावून सांगितले. विद्यार्थींनींना उद्देशुन सांगताना महिलांसाठी असलेल्या विविध योजना, निर्भया पथक कसे कार्य करते याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी सर्व इमारतीची पाहणी केली त्यामध्ये गोपनीय कक्ष, शस्त्रागार, हजेरी कक्ष, मुद्देमाल कक्ष असे विविध कक्षांचे निरीक्षण केले. या सर्वामध्ये विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी श्री. आयुब नदाफ, श्री. सुहास वाघमारे, श्री. बारगीर (हेड कॉन्स्टेबल) उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रीदेवी कुल्लोळी आणि इयत्ता 6 वी व 7 वी च्या सर्व वर्गशिक्षिका उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.