प्रतिष्ठा न्यूज

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने : मराठा विद्यार्थी, युवकांसाठी ५१ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : मराठा आरक्षणाचा प्रश्न गुंतागुंतीचा व जटील झाला असून न्यायप्रविष्ट झालेने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित रहावे लागत असून समाजाचे नुकसान होत आहे. आरक्षणा अभावी गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणीमुळे विद्यार्थी आणि युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. भावी पिढीच्या भवितव्यासाठी सारथी आणि कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अनेक योजना आंदोलनातून सुरु करून घेतल्या आहेत. या योजना गाव कुसापर्यंत पोहचवण्यासाठी ५१ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये
🔹छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) वतीने देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती,
🔹कै.अण्णासो पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बिन व्याजी कर्ज योजना
या योजनांची माहीती देण्यासाठी तज्ञ व्यक्ती, संबधित अधिकारी, समन्वयक यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ घेण्याची आव्हान  मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले आहे.

*शिबीर ठिकाणे*

🔵  ऑगस्ट :-
१)राजर्षी शाहू स्मारक १३ ऑगस्ट२) निगवे दुमला ,२७  ऑगस्ट,  ३)दोनवडे.. २७  ऑगस्ट,    ४)शाहू स्मारक मेळावा ३१ऑगस्ट,
🔵  सप्टेंबर :-,
५)वाठार   ६)चंदगड,७)हातकणंगले, ८)शिरोळ, ९)आर के नगर
१०) केनवडे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.