प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील तासगाव तालुक्याचे भूषण- रोहितदादा आर आर पाटील यांचे गौरवोद्गार

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी दि. 30: वृक्षारोपण,आरोग्य व रक्तदान शिबिरे,कोविड योद्धा म्हणून केलेले भरीव काम, छत्रपती शिवरायांच्या पत्रावर संशोधनपर लेखन, युवकांचा मार्गदर्शक, गावासाठी आर्थिक केंद्र म्हणून एटीएम सुविधा, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान, निर्व्यसनी व चारित्र्यवान युवासंपत्तीची बांधणी याचबरोबर आपल्या मूळ कामांमध्ये शिक्षक म्हणून सातत्याने राज्यस्तरावर आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेत आणणारे महाराष्ट्र युवारत्न शशिकांत पाटील सर हे तासगाव तालुक्याचे भूषण आहेत असे गौरवोउद्गार युवानेते रोहितदादा आर आर पाटील यांनी काढले.
            सालाबाद प्रमाणे जिल्हा परिषद शाळा हातनूर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन काशिनाथ पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा हातनुर व उज्वल विद्यामंदिर हातनूर येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ व विसापूर महसूल सर्कल मधील 21 गावातील सर्वात दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी स्नेहा शशिकांत पाटील, संस्कृती संतोष सिंहासने, नेहा परशुराम पाटील, श्रेया अजित पाटील, व विविध स्पर्धा परीक्षांच्या मध्ये सुयश मिळवलेल्या श्रेया सचिन पाटील,अनुष्का उत्तम पाटील, रिया सचिन पाटील, संस्कृती किरण कोष्टी या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक महाराष्ट्र युवारत्न शशिकांत राजाराम पाटील सर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
  इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये साईराज जालिंदर पाटील व एन एम एम एस परीक्षेतील यशाबद्दल सिद्धी संभाजी पाटील व आशुतोष संजय बुधावले व त्यांचे मार्गदर्शक पल्लवी भोसले, वैशाली पवार, ज्योती कापसे, तसेच चौथी, सातवी पतंगराव कदम गुणवत्ता शिष्यवृत्ती मध्ये यश मिळवल्याबद्दल शशिकला पाटील ,कलावती कदम यांचा सत्कार करण्यात आला.
 मित्सुबिशी या कंपनीच्या सीएसआर फंडातून मॉडेल स्कूल साठी भरीव देणगी मिळवून देणाऱ्या सुनिता रविंद्र कुंभार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
उज्वल विद्या मंदिर हायस्कूल मधील सर्व गुणवंत व क्रीडा स्पर्धा मध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी रोहितदादा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    यावेळी उज्वल विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व तासगाव तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष यांना नुकताच महाराष्ट्र  राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंदराव शहाजी पाटील सर यांचा रोहिदादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वसंतराव पाटील तर नियोजन महादेव जंगम व प्रमोद कदम यांनी केले. सूत्रसंचालन व आभार शशिकांत पाटील यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.