प्रतिष्ठा न्यूज

तासगाव पालिकेत ठराव… महाशिवरात्री हा दिवस द्राक्ष दिन म्हणून साजरा व्हावा…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगांव तालुका व सांगली जिल्हा द्राक्षे उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. तासगांव हा द्राक्षांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तासगांव शहर व तालुक्यामधून आखाती देश, युरोप, रशिया व जगभरात हजारो टन द्राक्षांची निर्यात केली जाते.स्थानिक शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने शेती करून हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागा जगविल्या आहेत. अनेक प्रकारचे नवीन द्राक्षांचे वाण देखील इथल्या बागायतदारांनी निर्माण केले आहेत.द्राक्ष उत्पादनामुळे याठिकाणची बेदाणा बाजारपेठ ही जगप्रसिद्ध आहे. महाशिवरात्री हा सण नेहमी उन्हाळा ऋतुमध्ये येत असल्यामुळे या दिवशी द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीरात गारवा व शरीरातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी चांगली मदत होते. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शुद्ध द्राक्षे फायदेशीर आहेत. म्हणून उन्हाळ्यामध्ये द्राक्ष हे सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते. द्राक्षे हे फळ डोळ्यांसाठी फायदेशीर असून त्यापासून व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात मिळते, मधुमेहासाठी अत्यंत गुणकारी असलेले द्राक्ष फळामुळे अॅलर्जी दूर होते, कर्करोगास प्रतिबंध, व ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव इत्यादी गुणकारी गुणधर्मासाठी देखील द्राक्ष प्रसिद्ध आहे.त्यामुळे द्राक्षे खाल्ल्याने आरोग्यासाठीचे फायदे यासंबंधी लोकांमध्ये जगजागृती होईल,अशी भूमिका घेणे संयुक्तीक वाटते.महाशिवरात्री या दिवशी द्राक्ष फळांची मागणी वाढून द्राक्षे खाल्ली जावीत हा मुख्य उद्देश आहे.हा संदेश देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न असून महाशिवरात्री हा दिवस द्राक्ष दिन म्हणून संपूर्ण भारतभर भविष्यात साजरा झाला तर द्राक्षांची मागणी सर्व देशभर वाढेल,शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल,व त्यावर अवलंबून असणाऱ्या कृषी संलग्न व्यवसायांना भरभराटीचे दिवस येतील.इथल्या हजारो कुटुंबांना व हातांना काम मिळेल,हा यामागचा उद्देश आहे.
तासगांव परिसरातील प्रयोगशील व प्रगतशील द्राक्ष शेतकऱ्यांनी पिकविलेल्या द्राक्षांबाबत नागरिकांचे मध्ये जागरूकता व्हावी म्हणून ” महाशिवरात्री” हा दिवस “द्राक्ष दिन” म्हणून साजरा व्हावा,असा तासगाव नगरपरिषदेने ठराव केला असून पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मा.पृथ्वीराज पाटील यांनी या ठरावास मंजुरी देऊन याबाबत शासनास  विनंती केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.