प्रतिष्ठा न्यूज

गायरान अतिक्रमण नियमित करणेसाठी बलगवडे गावामधून पंचायत समिती व तहसिलदार यांना सांगली जिल्हातून पहिले पंचवीस प्रस्ताव दाखल

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : गायरान अतिक्रमण काढून टाकणेसाठी मा. तहसिलदारसो तासगांव यांनी अतिक्रमण धारकांना नोटीस दिलेली आहेत. त्यामधील कलम ६ मध्ये तहसिलदारसो यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे की जर केलेले अतिक्रमण दिनांक १७ नोव्हेंबर २०१८, दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ आणि २२ ऑगस्ट २०२२ च्या शासन निर्णयानुसार सुरक्षित होत असेल तर त्याबाबतची कागदपत्रे व खुलासे तहसिलदारसो यांना सादर करावे. त्यानुसार बलगवडे गावच्या ग्रामस्थांनी माजी सरपंच सौ जयश्रीताई पाटील, माजी उपसरपंच श्री श्रीकांत मोहिते व भाजप नेते श्री.अनिलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने सर्व कागदपत्रे व खुलासे तयार करुन असे प्रस्ताव मा. गटविकास अधिकारीसो तासगांव व मा. तहसिलदारसो तासगांव यांच्या कार्यालयामध्ये जमा केले. प्रस्ताव तयार करणेकामी ग्रामस्थांना श्री.तोडकर साहेब व उपसरपंच श्री.सचिन पाटील व सदस्य जमीर मुलाणी,शहाजी पाटील व महिला सदस्या यांनी मोलाचे सहकार्य केले. सदरचा प्रस्ताव पंचायत समिती व तहसिलदार यांना सादर करताना बलगवडे गांवचे उपसरपंच श्री.सचिन पाटील, माजी उपसरपंच श्री.श्रीकांत मोहिते, कर सल्लागार श्री विष्णू तोडकर, श्री.अशोक पाटील, श्री. संजय हाके,श्री.उदय पाटील, श्री. विजय पाटील, श्री परशराम माळी,श्री. किरण पाटील, श्री.चंद्रकांत पाटील, श्री.संतोष चव्हाण व श्री.संतोष बुधावले इ. ग्रामस्थ उपस्थीत होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.