प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिका लागली मान्सून पूर्व तयारीला : वखार भागातील धोकादायक इमारतींचा पहिला मजला निष्कासित; आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखली कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मान्सून पूर्व तयारीला लागली आहे. संभाव्य पावसाळा आणि सध्याची पावसाची स्थिती पाहता मनपाकडून अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वखार भागातील एक अतीधोकादायक ठरलेल्या इमारतीचा पहिला मजला महापालिकेकडून निष्कासित करण्यात आला. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त राहुल रोकडे यांच्या सुचनेनुसार
सदरची कारवाई करण्यात आली.
सदर इमारतीचा पहिला मजला महापालिकेने धोकादायक इमारत ठरवत धोकादायक असणारे बांधकाम पाडण्याबाबत नोटिस देण्यात आली होती मात्र सदर मिळकतदारानी धोकादायक भाग निष्कासित केला नसल्याने मंगळवारी महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने सदर इमारतीच्या धोकादायक असणारा पहिला मजला निष्कासित केला. या कारवाईत सहायक आयुक्त सहदेव कावडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणील माने, प्रभाग 1 चे दीपक कांबळे, अतिक्रमण विरोधी पथकाचे विक्रम घाडगे यांच्यासह मनपा विद्युत विभाग,वीज मंडळ कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, संभाव्य पावसाळा लक्षात घेता कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशानुसार मनपक्षेत्रातील धोकादायक तसेच अतीधोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. यासाठी महापालिकेचे प्रभगनिहाय 1 शाखा अभियंता आणि पाच स्वच्छता निरीक्षक असा स्टाफ नियुक्त केला असून आठ दिवसात सर्व्हे पूर्ण करून धोकादायक आणि अतिधोकादायक ईमारतीना नोटिसा बजावल्या जातील अशी माहितीही सहायक आयुक्त सहदेव कावडे यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.