प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज स्कूल इंटरनॅशनल बायजेपीएमटी मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी :  केंब्रिज स्कूल इंटरनॅशनल बायजेपीएमटी मध्ये मुलांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व गटातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
       या स्पर्धेमध्ये मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील वेशभूषा करून आपले प्रतिनिधित्व केले होते . यामध्ये क्रिकेट खेळामधील खेळाडूंची वेशभूषा, शेतकऱ्याची वेशभूषा, डॉक्टरांची वेशभूषा, वैज्ञानिकांची वेशभूषा, समाजसुधारकांची वेशभूषा, सैनिकांची वेशभूषा, विविध देवतांची वेशभूषा, भिकारी ची वेशभूषा, विविध राज्यातील स्त्रियांची व पुरुषांची वेशभूषा, पर्यावरण संरक्षण संबंधी वेशभूषा अशा विविध भूमिकेमधून आपली कला मुलांनी सादर केली .
       या वेशभूषा स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून स्टेट बोर्डच्या शिक्षिका सौ शोभा काळे मॅडम, सौ प्रणाली ललित मॅडम यांनी काम पाहिले.
     या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ क्रिस्टीना मार्टिन मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ पद्मा सासनूर मॅडम, समन्वयिका अश्विनी येलकर मॅडम तसेच सर्व शिक्षक ,पालक, विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
     या स्पर्धेचे नियोजन सौ दिपाली शिंदे मॅडम, सौ मेरी मॅडम, माधुरी मॅडम, सौ सुनिता कमलेकर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी हंबर, आदिती कुंभोजे, फरहत जमादार,मिरब मुजावर, या विद्यार्थिनींनी केले. आभाराचे काम कनक पटेल या विद्यार्थिनीने केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.