प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहाने साजरा

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज येथे कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिन ” मराठी भाषा गौरव दिन” म्हणून उत्साहाने साजरा करण्यात आला.
          विद्यालयाचे मु.अ.श्री बी.एम.हंगरगे यांनी कवी कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित सर्व कर्मचारी यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
 महान कवी कुसुमाग्रज यांना राजर्षी शाहू विद्यालय येथे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मु.अ. बालाजी हंगरगे,उप मुख्याध्यापक श्री पंजाबराव सावंत, प्रा.तुकाराम जाधव, श्री आनंद मोरे,श्री राजेश कदम,श्री बालाजी गर्जे,बाळासाहेब माने,तसेच श्रीमती सुनीता पावसे,श्रीमती लोलम, श्रीमती घोडेकर, श्रीमती जाधव,श्रीमती गिरी मॅडम आदिजण उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.