प्रतिष्ठा न्यूज

आरगमध्ये झालेल्या स्केटिंग स्पर्धेमध्ये खाडे पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : येथील आरग गावामध्ये शिवजयंती व प्रोग्रेस सेवाभावी संस्था आरग यांच्या  13 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्केटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष गायकवाड यांनी गुलाब पुष्पगुच्छ देऊन केले. या स्पर्धेसाठी मिरज, तासगाव, जत, मालगांव येथून खेळाडूंनी वर्णी लावली होती. या स्पर्धेसाठी कोच म्हणून मनोज यादव मिरज, सतीश थोरात तासगाव, अभय रोकडे जत यांनी काम पाहिले. या स्पर्धा ४ -६-८-१०-१२-१४ वर्षाखालील व खुला गट आशा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये मुलांनी हिरारीने भाग घेऊन नंबर देखील काढले. त्यामध्ये श्रेयस माळी, शुभ्रा पाटील, सरस जगताप, श्रेया माळी, तन्मय परीट, आदित्य सौंदत्ती, साद शेख, मोहित जाधव, विघ्नेश भोई, सारंग कानडे इत्यादी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तसेच यावेळी भाग घेणाऱ्या सर्व मुलांना सहभाग प्रमाणपत्र व विजेत्यांना ट्रॉफी व सहभाग प्रमाणपत्र प्रमुख पाहुणे  सागर वडगावे, अनिल कोरबू,  प्रकाश गायकवाड, संदीप नाईक, द्वारकेश जाधव,
विजय देसाई, खाडे पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, शिक्षिका मनीषा जाधव, योगेश रोकडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धच्या चॅम्पियन शिल्डचे खाडे पब्लिक स्कूल मानकरी ठरले. यावेळी खेळाडू पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.