प्रतिष्ठा न्यूज

तासगावातील माईनकर मळ्याकडे जाणाऱ्या ओढा पात्रातील रस्ता कामात भ्रष्टाचार? संबंधित कामाच्या चौकशीची वंचितची मागणी…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:येथील मुस्लिम कब्रस्थान तें माईनकर मळा ओढा पात्रातील काही महिन्यापूर्वी करण्यात आलेला डांबरी रस्ता हा निकृष्ट केला असून या कामात भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची चौकशी करून सदर कामातील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे असे निवेदन आज वंचित बहुजन आघाडीचें शहर अध्यक्ष शिवाजी गुळवे यांनी नगरपालिका प्रशासनास दिले आहे.तसेच कस्तुरबा गांधी मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयचा ताबा मिरज सिव्हिलकडे देऊन रुग्णालय तात्काळ सूरू करण्यात यावे अन्यथा 4 मार्च पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा गुळवे यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.