प्रतिष्ठा न्यूज

विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास अटक; ५०,८००/- रु. किंमतीचे १ अग्निशस्त्र व २ जिवंत काडतुसे हस्तगत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५०,८००/- रु. किंमतीचे १ अग्निशस्त्र व २ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जावेद जाकिर शेख, वय ३० वर्षे, रा. ईदगाहनगर, उस्मानी मोहल्ला, मिरज. ता. मिरज जि. सांगली. असे आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे शस्त्रे बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने दि. ०१/०७/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोकों / अभिजीत ठाणेकर व पोकों रोहन घरते यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नाचे जावेद शेख रा. ईदगाहनगर मिरज हा पिस्टल विक्री करणेकरीता मिरज येथील जनावर बाजार जवळ येणार आहे.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे मिरज मधील जनावर बाजार परिसरात निगराणी करत असताना, अंगात जांभळ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेला एक इसम संशयितरित्या जनावर बाजार गेटजवळ येवून थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव जावेद जाकिर शेख, वय ३० वर्षे, रा. ईदगाहनगर, उस्मानी मोहल्ला, मिरज. ता. मिरज जि. सांगली असे असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेस पाठीमागील बाजुस पॅन्टचे आत १ देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झीनसह आणि पॅन्टचे खिशात २ जिवंत काडतुसे मिळून आली.

सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणे बाबत त्याचेकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्या बाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले.

लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे पुढील तपासकामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपी विरुध्द पोकों / अभिजीत ठाणेकर यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, सपोफौ / अनिल ऐनापुरे, पोहेकों / अमोल ऐदाळे, सचिन धोत्रे, कुबेर खोत, अरुण पाटील, अनंत कुडाळकर, इम्रान मुल्ला, संकेत मगदुम, पोशि / अभिजीत ठाणेकर, विनायक सुतार, सुनिल जाधव, रोहन घरते, सुरज थोरात, स्था. गु. अ. शाखा, पोना / श्रीधर बागडी, पोशि/ विवेक सांळुखे, अजय पाटील, सायबर पोलीस ठाणे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.