प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय,ज्युनियर काॅलेज येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय जुनियर कॉलेज कस्तुरबा गांधी विद्यालय आणि राजर्षी शाहू बालक मंदिर येथे भारतीय स्वातंत्र्याचा भारत स्वातंत्र्य दिन उत्साहाने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला विद्यालयाचे प्राचार्य श्री बी एम हंगरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक श्री आनंदराव लाटकर,डॉ. पी डी जाधव , डॉक्टर गोपाळराव कदम श्री चंद्रशेखर सोनवणे ,श्री गोविंदराव थेटे यांच्यासह संस्थेच्या मार्गदर्शिका  हितचिंतक तथा सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गायत्री वाडेकर मॅडम उपस्थित होत्या.
विद्यालयाचे प्राचार्य श्री बी.एम.हंगरगे यांच्या हस्ते १५  ऑगस्ट देशाच्या ७६ वा  स्वातंत्र्य दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी व महामानव डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन  ध्वजारोहण करण्यात आले.
       यावेळी प्रमुख पाहुणे,तसेच डॉ.वाडेकर मॅडम यांच्या हस्ते शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य डॉ.पांडूरंग यमलवाड,  पर्यवेक्षक श्री पंजाबराव सावंत , प्रा.सुभाष तिवडे, प्रा.तुकाराम जाधव, श्री बालाजी कदम, मु.अ.सुर्यकांत टापरे, श्री बी.डी.देशमुख सर,सहशिक्षक  श्री अमोल भंगाळे,आनंद मोरे, श्री एन.पी.केंद्रे,क्रिडा शिक्षक श्री टी.एन. रामनबैनवाड , श्री सोनाजी वाडेकर,    मु.अ.सौ.ज्योती ढेंगळे, वरिष्ठ लिपीक श्री आर.आर.महालिंगे,  तसेच समस्त महाविद्यालयांचे प्राध्यापक व शिक्षकवृंद व कर्मचारी, माज़ी विद्यार्थी, पालक, सर्वांची  मोठ्या संख्येने   प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत  गायन   केले. या कार्यक्रमात एन.सी.सी.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री शिवानंद टापरे यांनी केले तर आभार डॉ.एम.एम.गाडेकर यांनी मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.