प्रतिष्ठा न्यूज

तासगावात अवैधरित्या सुरु असलेल्या*कपल कॅफेवर* कारवाई करा मनसेची पोलीस प्रशासनाकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव शहरात गेल्या अनेक दिवसापासून अवैधरित्या कॅफेच्या नावाखाली कपल कॅफे सुरु आहेत.या कपल कॅफेवर ताबडतोब कारवाई करा अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.त्यात त्यांनी म्हंटले आहे की या कॅफे मध्ये येणाऱ्या  प्रेमीयुगुला कडून फक्त एक तास बसण्या साठी 300 ते 500 रुपये  घेतले जातात.या कॅफे मध्ये चाळे करण्यासाठी अल्पवयीन मुलं आणि मुली तासांनतास बसताना दिसत आहेत.हे सर्व राजरोस पने सुरु आहे.शाळकरी मुले मुली चुकीच्या मार्गाने जात आहेत.काही दिवसापूर्वी प्रशासनाने कॅफे मालकांना समज देऊन सोडून दिले होते.त्यानंतर पुन्हा सर्व कॅफे जोरदारपने सुरु आहेत.याबाबत तासगावचे पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.या अशा कॅफेच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील प्रकारावर लवकरात लवकर कारवाई करून कॅफे मालकांवर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी मनसे नेते अमोल काळे व सोमनाथ चव्हाण यांनी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.