प्रतिष्ठा न्यूज

गव्याच्या हल्ल्यात एक गंभीर; मंदूर -पाटीलवाडी या. गगनबावडा येथील घटना

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा :  नेहमीप्रमाणे सकाळीच शेतामध्ये वैरण काढण्यासाठी गेले असता, पाठीमागून येऊन गवारेड्याने हल्ला केल्याने मंदूर -पाटील वाडी येथील केरबा मारुती पाटील ( वय ३५) या तरुणास या हल्ल्यामध्ये गंभीर दुखापत झाली आहे. पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कोल्हापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मंदूर परिसरात गवारेड्याचा वावर नेहमीचाच असतो. त्यामुळे त्या भागातील लोक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तालुक्यात गवारेड्यांचा वावर वाढला असल्याने शेतीचे  मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतो. त्याचप्रमाणे माणसावर बरेच वेळा हल्ले घडलेले आहेत. यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत. प्रशासन व वनविभागाने गवारेड्यांचा बंदोबस्त साठी काही ठोस उपाययोजना करणे अत्यंत जरुरीचे आहे. अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन करावे लागेल.”
     – प्रकाश पाटील,अध्यक्ष, गगनबावडा तालुका राष्ट्रवादी पक्ष. 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.