प्रतिष्ठा न्यूज

जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेतील बक्षीस सायकलचा मानकरी ठरला मिरजेचा अर्हम जाधव..

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली :  निपुण अबॅकस तर्फे जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धा २०२३-२४  घेण्यात आल्या. या स्पर्धा आचार्य आदीसागर हॉल सांगली येथील हॉलमध्ये घेण्यात आल्या . या स्पर्धेत जिल्ह्यातील ६०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.  त्यामध्ये मातोश्री तानुबाई दगडु खाडे इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरजेच्या अर्हम जाधव याने आठ मिनिटात दीडशे गणित सोडवून चॅम्पियनशिप मिळवली व सायकलचा मानकरी ठरला. त्याचबरोबर ट्रॉफी गोल्ड मेडल व सर्टिफिकेटही मिळवले.  तर पुढील मुलांनी बेस्ट परफॉर्मन्स करत पारितोषिके मिळवली. त्यामध्ये पृथ्वीराज चौगुले, पुनित पाटील, पृथ्वीराज गौराजे, अनुष्का तानंगे, निशान मुल्ला, अरुण पाटील, हर्षवर्धन माने, श्रीजीत पाटील, अनुष्का खोत, ऋग्वेद दुर्गाडे, आरोही बनसोडे, दिव्यम तुकमवार, अन्वी कोरे, रणवीर सावंत, विराज कबाडगे, अर्णवी चौगुले, आदिराज चौगुले, आरूष कोरे, श्लोक मगदूम, अंश दबडे, युवराज चकाके यांचा समावेश आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका अश्विनी कुलकर्णी, पूर्वा पाचोरे व प्रदीप पाचोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
           या स्पर्धेसाठी मुलांना संस्थेचे अध्यक्ष, पालकमंत्री तथा कामगारमंत्री सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे व मुख्याध्यापिका संगीता पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.