प्रतिष्ठा न्यूज

नगरसेविका सोनाली ताई सागरे यांच्या विकास निधीतून कंजारभाट समाज स्मशानभूमी कुपवाड येथे अनेक सोई सुविधांची कामे सुरू

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : कुपवाड येथील कंजारभाट समाज स्मशानभूमीमध्ये नगरसेविका सोनाली ताई सागरे यांच्या विकास निधीतून अनेक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये ऊंच पोल व लाईट ची व्यवस्था करण्यात आली आहे . त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. गेली 10 वर्षे झाली या स्मशानभूमीला जागा मिळाली आहे परंतु या ठिकाणी कोणत्याच सोई-सुविधा नव्हत्या. येथील नागरिकांची मागणीचा विचार व गरज लक्षात घेऊन  बोअर वेल व स्ट्रीट लाईट पोल चे काम पूर्ण केले. तसेच उर्वरीत दहन कट्टा, शेङ व निवारा शेङ साठी पाठपुरावा करून ते हि कामे मार्गी लावण्याचा आमचा मानस असल्याचे नगरसेविका सागरे यांनी सांगितले. यावेळी नागरीकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.
      यावेळी नगरसेविका कल्पना कोळेकर, महेश सागरे,  कंजारभाट समाज सरपंच धर्मेंद्र नगरकर, सचिन नगरकर, रोहित नगरकर,कृष्णा खांडेकर, सुनिल गाङे, भोला माच्छरे, नितीन नगरकर,राजू शिरकनळे,सतिश नगरकर अदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.