प्रतिष्ठा न्यूज

आमदार निधीतून नरवेलीत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता ७ : नरवेली ( तालुका गगनबावडा ) येथे आमदार पी.एन.पाटील यांच्या फंडातून  सामाजिक सभागृह मंजूर झाले. या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पंचायत समिती माजी सदस्य आनंदा पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी  सेवा निवृत्त गटशिक्षणाधिकारी ए.बी.पाटील होते.
यासाठी आमदार फंडातून १० लाख  रूपयांचा निधी मंजूर झाला असून यातून   सामाजिक सभागृहाचे बांधकाम होणार आहे. व त्याचा लाभ ग्रामस्थांना होणार आहे.
यावेळी सरपंच सौ.सुनिता लांबोर , सदस्य उत्तम पाटील, श्री गांगोबा तरूण मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.