प्रतिष्ठा न्यूज

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानात श्री साईबाबा हायस्कूल तालुका स्तरावर प्रथम

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या स्पर्धात्मक अभियानाच्या माध्यमातून व विविध उपक्रमाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा वाचनाची आवड निर्माण होऊन ज्ञानात वाढ होऊन नवनवीन कल्पना आत्मसात होण्यासाठी राज्य शासनाकडून भौतिक सुविधा व उपक्रमात वाढ यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हा उपक्रम राबवला जात असतानाच लोहा तालुक्यातील मारतळा येथील श्री साईबाबा हायस्कूल या शाळेने केंद्रातून प्रथम येण्या बरोबर तालुका स्तरावर प्रवेश करून तालुका स्तरावरही तालमातून प्रथम येणाचा मान मिळविला आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षकव शिक्षकेतर कर्मचारी यांचे परिश्रम मोलाचे ठरले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव- स्वप्नील पाटील उमरेकर यांनी मुख्याध्यापक- एकनाथ मोरे सह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तरकर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या शाळेने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, व उमरा परिसरातील सर्व शाळांनी, लोकप्रतिनिधी व पालक यांनी कौतुक केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.