प्रतिष्ठा न्यूज

वाजेगाव सौरऊर्जामय करा; मुबलक पाणी पुरवठ्यासाठी नवीन टाकी बांधा : पृथ्वीराज पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२४: मिरज तालुक्यातील वाजेगावच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत श्री वाजुबाई ग्रामविकास पॅनेलने सरपंच पदासह ७पैकी ४ जागा जिंकून एकहाती सत्ता प्राप्त केली आहे.
नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी पृथ्वीराजबाबा पाटील यांची त्यांच्या यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात भेट घेतली त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी लोकनियुक्त युवा सरपंच दिपक खराडे,अनिता जाधव(विनोद जाधव),, दिगंबर कदम, रामचंद्र पाटणकर, सारीका मोहिते (धनंजय मोहिते) यांचा फेटा बांधून सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘वाजेगावमध्ये काँग्रेस पुरस्कृत श्री वाजुबाई ग्राम विकास पॅनेलने भिकाजी, आनंदराव व सुभाष पाटणकर , रमेश खराडे व शैलेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत भरघोस यश मिळविले आहे. आता गावच्या समस्यांची यादी तयार करा. आणि कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्यामध्ये शंभर टक्के सौरऊर्जामय वाजेगाव व लोकसंख्येच्या प्रमाणात मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी टाकीचे नवीन बांधकाम या कामांना तात्काळ प्राधान्यक्रम देऊन वीज व पाणी या बाबतीत गावची चिंता मिटवा.. क्रिडांगण, गटारींची बांधकामे व स्मशानभूमी सुशोभीकरण ही कामेही या पंचवार्षिक कालावधीत पूर्ण करा.’
यावेळी सरपंच दिपक खराडे, दिगंबर कदम, आनंद, भिकाजी व रामचंद्र पाटणकर, विनोद जाधव धनंजय मोहिते,यशोधन सेवा व संपर्क कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. एन.डी.बिरनाळे, आशिष सुर्यवंशी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.