प्रतिष्ठा न्यूज

सांगली येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 4 : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सांगली येथे काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीचे उद्घाटन आकाश माने यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या मंजिरी देशपांडे यांच्यासह अंध, मतिमंद, अस्थिव्यंग, कर्णबधीर अशा एकूण 700 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
रॅलीनंतर डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित नृत्य सादर केले. नृत्यातून सामाजिक बांधिलकी देणारे चांगले संदेश देण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमांमध्ये रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनी मोलाचा सहभाग नोंदवला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच जॉइंट्स इंटरनॅशनलचे पदाधिकारी विलास पवार व चंद्रकांत जगदाळे, प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी रामदास कोळी, शकील खलिफा आदि उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.