प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

हिंदुएकता आंदोलन-वंदे मातरम संयुक्त विद्यमाने शिव उत्सव मोठ्या थाटामाटात सुरुवात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : हिंदू एकता आंदोलन वंदे मातरम यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा चौकात मोठ्या थाटामाटात शिवउत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.पीएनजीचे संचालक सिद्धार्थ दादा गाडगीळ यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावरील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.त्याचवेळी शिवभक्तांनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला. त्याचबरोबर श्री. गुरुदत्त खिलारे यांनी रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रेखाचित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन सांगलीतील प्रतिष्ठित उद्योगपती ह.भ.प.मनोहर भाई सारडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.हे प्रदर्शन ९ मे ते १३ मे पर्यंत जनतेला पाहण्यासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.त्याच बरोबर शिवकवच कला-क्रीडा मंडळ यांनी तयार केलेल्या जयगड, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग,स्वराज्या आरमाराची राजधानी विजयदुर्ग, यांच्या प्रतिकृती स्टेजवर शिवभक्तांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवहान माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण सयोजन हिंदू एकता आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील, शहर जेष्ठ नेते दत्ता भोकरे, माजी शहराध्यक्ष तानाजी शिंदे, दत्ता चव्हाण, विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार, बाळासाहेब मोहिते, अवधूत जाधव, शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण,अरुण वाघमोडे, गजानन मोरे, सुमित शिंगे, आकाश काळे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.