प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

आर्य अबॅकसचा सामाजिक उपक्रम गरजू व होतकरू मुलांसाठी

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली:  इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अपंग,अनाथ किंवा आई वडील या दोघांपैकी एक व्यक्ती मयत झाली आहेत, अशा विद्यार्थ्यांचा अबॅकस च्या १० लेवल पर्यंतचा रुपये ३०,५००/- पर्यंतचा खर्च आर्य अबॅकस अँण्ड् वैदिक मॅथ्स् असोसिएशन या संस्थे मार्फत केला जाणार आहे.अशा विद्यार्थ्यांना अबॅकस साठी १ रूपयाही खर्च करावा लागणार नाही. संपूर्ण अबॅकस साहित्य व स्पर्धा परीक्षा सहित शिक्षण मोफत मिळणार आहे. अशी माहिती आर्य अबॅकस चे संस्थापक अध्यक्ष विवेक संकपाळ यांनी दिली आहे. यासाठी लागणारी कागदपत्रे अपंग प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे आधार कार्ड झेरॉक्स.विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला.आई किंवा वडील यांच्या मृत्युचा दाखला, हयात आई किंवा वडिलांचे आधारकार्ड झेरॉक्स इत्यादी.असे विद्यार्थी आपल्या आसपास असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहचवावा असे आवाहन केले आहे. आर्य अबॅकस अँण्ड् वैदिक मॅथ्स् असोसिएशन- 7057258214
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.