प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी

प्रतिष्ठा न्यूज /राजू पवार
नांदेड : शहरातील राजर्षी शाहू विद्यालय जुनियर कॉलेज येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक, मार्गदर्शक   श्री चंद्रकांत सोनवणे हे होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी. एम. हंगरगे आणि चंद्रकांत  सोनवणे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या  प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्या स्मृती स अभिवादन करण्यात आले.
        जननायक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील उल्ले हातु या गावी 15 नोव्हेंबर 1875  रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगनामुंडा व आईचे नाव करमी  असे होते. त्यांनी आदिवासी समाजावर इंग्रज अधिकाऱ्याकडून ख्रिस्ती मिशनऱ्याकडून व जमीनदार ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली त्यांनी अनेक जण आंदोलने केली म्हणून त्यांना जननायक हा किताब बहाल केला.
           प्रत्येक गावच्या प्रमुखास मुंडा असे म्हणतात,  त्यामुळे त्यांचे आडनाव मुंडा असे पडले.  19 व्या शतकाच्या अखेरपर्यंत हा लढा त्यांनी दिला. तसेच शेकडो सैनिक त्यांनी  तयार केले .आदिवासी कोल  समाजास अखेर न्याय मिळवून दिला. अशा रीतीने बिरसा मुंडा हे “धरतीचा देव” बनले.  अशा जननायक,क्रांतिकारक थोर  युग पुरुषांची जयंती राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यांच्या पावन स्मृती स अभिवादन करण्यात आले.
       यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री चंद्रकांत सोनवणे साहेब, मु.अ.बालाजी हंगरगे, तसेच     विद्यालयाचे कर्मचारी श्रीमती मथुरा बाई घोडेकर, श्रीमती जाधव बाई  आणि कस्तुरबा गांधी विद्यालयाचे मु.अ. श्री सुर्यकांत टापरे आदिजण उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड राज्यातील उल्ले हातु या गावी 15 नोव्हेंबर 1875  रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगनामुंडा व आईचे नाव करमी  असे होते. त्यांनी आदिवासी समाजावर इंग्रज अधिकाऱ्याकडून ख्रिस्ती मिशनऱ्याकडून व जमीनदार ठेकेदाराकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मरेपर्यंत लढा देण्याची प्रतिज्ञा केली त्यांनी अनेक जण आंदोलने केली म्हणून त्यांना जननायक हा किताब बहाल केला.

           प्रत्येक गावच्या प्रमुखास मुंडा असे म्हणतात,  त्यामुळे त्यांचे आडनाव मुंडा असे पडले.  19 व्या शतकाच्या अखेरपर्यंत हा लढा त्यांनी दिला. तसेच शेकडो सैनिक त्यांनी  तयार केले .आदिवासी कोल  समाजास अखेर न्याय मिळवून दिला. अशा रीतीने बिरसा मुंडा हे “धरतीचा देव” बनले.  अशा जननायक,क्रांतिकारक थोर  युग पुरुषांची जयंती राजर्षी शाहू विद्यालय व ज्युनियर काॅलेज मध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. त्यांच्या पावन स्मृती स अभिवादन करण्यात आले.
       यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री चंद्रकांत सोनवणे साहेब, मु.अ.बालाजी हंगरगे, तसेच     विद्यालयाचे कर्मचारी श्रीमती मथुरा बाई घोडेकर, श्रीमती जाधव बाई  आणि कस्तुरबा गांधी विद्यालयाचे मु.अ. श्री सुर्यकांत टापरे आदिजण उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.