प्रतिष्ठा न्यूज

वायफळे सर्कलचा दुष्काळी यादीत समावेश करा सहा गावांची तहसीलदारांकडे मागणी : आंदोलनाचा इशारा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश मंडळांच्या यादीतून वायफळे (ता. तासगाव) हे मंडळ वगळण्यात आले आहे. या मंडळाचा दुष्काळी यादीत तातडीने समावेश करून सवलती लागू कराव्यात, अशी मागणी सहा गावांनी केली आहे. याबाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना दिले आहे. वायफळे सर्कलचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्यास सहा गावे तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारने नुकतीच राज्यातील 1021 मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली आहे. तासगाव तालुक्यातील सावळज, मणेराजुरी, येळावी, मांजर्डे, विसापूर, तासगाव या मंडळांचा दुष्काळसदृश यादीत समावेश आहे. मात्र वायफळे या एकमेव मंडळाचा दुष्काळी यादीत समावेश नाही. सरकारच्या या अनागोंदी कारभाराबाबत वायफळे सर्कलमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 2018 मध्ये वायफळे सर्कलची स्थापन करण्यात आली आहे. याठिकाणी स्वतंत्र मंडळ अधिकारी कार्यालय आहे. वायफळे मंडळात वायफळे, यमगरवाडी, जरंडी, दहिवडी, बिरणवाडी व बस्तवडे या गावांचा समावेश होतो. यावर्षी पावसाळ्यात या गावांमध्ये अवघा 63.96 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस 75 टक्क्यांपेक्षा कमी व एकूण 750 मिलिमीटरपेक्षा कमी आहे.वायफळे सर्कल सर्व बाजूनी दुष्काळी यादीत समावेशास पात्र असताना शासनाने दुष्काळी यादीतून ते वगळले आहे. या सर्कलमधील 6 गावांमध्ये शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई आहे. चाराही मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र तरीही वायफळे सर्कल दुष्काळी यादीतून वगळल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.याप्रकरणी वायफळे सर्कलमधील 6 गावच्या ग्रामपंचायतींनी निवासी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांची भेट घेतली. वायफळे सर्कल तातडीने दुष्काळी यादीत समावेश करावे, अशी आग्रही मागणी केली. जर या सर्कलचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वायफळेचे लोकनियुक्त सरपंच संतोष नलवडे, बिरणवाडीचे सरपंच उमेश मोरे, आर. जे. पाटील, राजेश पाटील, अर्जुन यमगर उपस्थित होते.
*तासगाव : वायफळे सर्कलचा दुष्काळी यादीत समावेश करावा, या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांना देण्यात आले. यावेळी वायफळेचे लोकनियुक्त सरपंच संतोष नलवडे, बिरणवाडीचे सरपंच उमेश मोरे, आर. जे. पाटील, राजेश पाटील उपस्थित होते.*
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.