प्रतिष्ठा न्यूज

सांगलीतील शांतीनगर येथील मंदिरात श्री मरगुबाई देवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : शांतीनगर येथील 150 वर्षे जुन्या असलेल्या मातंग समाजाचे दैवत श्री मरगुबाई देवी मंदिरात आज हिंदू पद्धतीप्रमाणे विधिवत पूजाअर्चा करून श्री मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. श्री मरगुबाईच् देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा श्री.अक्षय कांबळे व सौ.आकांक्षा कांबळे, तसेच श्री.विकास आवळे व सौ.मयुरी आवळे यांच्या शुभहस्ते आणि हिंदू धर्मरक्षक नरवीर पुरस्कार प्राप्त माजी आमदार श्री नितीनराजे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी श्री मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बोलताना माजी आमदार व हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष नितीनराजे शिंदे म्हणाले की, शांतीनगर मधील देवस्थान हे हिंदू मातंग समाजाचे जुने श्रद्धास्थान असून या मरगुबाई देवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नगरसेविका ॲडव्होकेट सौ.स्वातीताई शिंदे यांनी अंदाजे वीस लाख रुपयेंचा निधी हा खर्च केला असून, या मंदिराचा लोकार्पण सोहळा हिंदू धर्मातील साधुसंत महंत व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत लवकरच करण्यात येणार आहे. हिंदू – मातंग समाजातील या ठिकाणच्या सर्व समाज बांधवांनी  कोणतेही धर्मांतरण न करता या भागातील हिंदू मातंग समाजाने आजपर्यंत भागातील हिंदू धर्म जिवंत ठेवण्याचे महत्वपूर्ण काम आजतागायत केलेले आहे. याबद्दल आमदार नितीन शिंदे यांनी सर्व हिंदू मातंग समाजाचे कौतुक व आभार व्यक्त केले. यावेळी श्री.अर्जुन कांबळे यांचे भाषण झाले.या कार्यक्रमाला परिसरातील भाविक व हिंदू मातंग समाजातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी अभिमन्यू भोसले, अमित भोसले, अर्जुन कांबळे, अक्षय कांबळे, पुजारी विकास आवळे, राजू मगदूम, चंद्रकांत आवळे,  विजय आवळे, विकास भोसले, विशाल आवळे, नितीन केन्चे, आशा कांबळे, मयुरी कांबळे, शिलाखे यांचेसह हिंदू मातंग समाजातील नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.