प्रतिष्ठा न्यूज

तासगावात शनिवारी भारत संकल्प यात्रा… नागरिकांनी याचा लाभ घ्यावा मुख्याधिकारी पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव  : तासगावमध्ये शनिवारी ०६/०१/२०२४ रोजी भारत संकल्प यात्रेनिमित्त विविध योजनांची माहिती देणाऱ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ९ त्ते १ या वेळेत छत्रपती श्री शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालय तासगाव व दुपारी ३ ते ७ या वेळेत चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर तासगाव या दोन ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा शासकीय योजनांच्या माहितीचे दालन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. तासगाव येथे केंद्र शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ शनिवारी दाखल होणार आहे.या उपक्रमामध्ये प्रधानमंत्री स्वनिधी योजना,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, आभा- गोल्डन कार्ड काढणे,आधार कार्ड अद्ययावत करणे यासह विविध योजनांची माहिती देण्यासह लाभ देणेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.शासनामार्फत शहरातील नागरिकांना ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याची माहिती या यात्रेत दिली जाणार आहे.तरी तासगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने नियोजित ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन तासगाव नगरपालिका मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.