प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथील अनिल जाधव खून प्रकरणातील मुख्य संशयीत तांबेकरला अटक…तीन दिवस पोलीस कोठडी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : शिवनेरी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांचा ४ ऑगस्ट २२ रोजी रात्री साडे नऊ  वाजण्याच्या सुमारास घराशेजारीच धारधार हत्याराने वार करून खून करण्यात आला होता.या प्रकरणी अनिल जाधव यांचा मुलगा आशिष जाधव (वय २५) यांनी तासगाव पोलिसात अकरा जणां विरोधात फिर्याद दाखल केली होती.या खून प्रकरणात मुख्य संशयित म्हणून कमलेश तांबेकर याचे नाव होते.या घटने नंतर संशयित कमलेश हा पसार झाला होता.तो अटक पूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत होता,पण सांगली येथील सत्र न्यायालय व मुबई उच्च न्यायालयाने कमलेश याचा अटक पूर्व जमीन फेटाळला होता.घटना घडल्या नंतर सतरा महिने तो फरार होता.तांबेकर याला अटक करावी यासाठी शिवनेरी मंडळाचें सभासद,गल्लीतील नागरिक,महिला लहान थोर मंडळींनी रस्त्यावर उतरून रस्ता रोको,धरणे आंदोलन,ठिय्या आंदोलक प्रसंगी पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले होते.मात्र संशयित तांबेकर हा पोलिसांच्या हाताला लागत नव्हता.पोलिसाच्यावर जनता,कार्यकर्ते व राजकीय दबाव असून ही कमलेश पोलिसांना सापडत नव्हता.अनिल जाधव खून प्रकरणी अकरा संशयित निष्पन्न झाले होते.त्यातील दहा जणांना अटक होऊन सात जणांची जामिनावर या पूर्वीच सुटका झाली आहे.या खून प्रकरनातील तीन जण अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.या खून प्रकरणी गेले सतरा महिने फरार असणारा या खुनातील मुख्य संशयित कमलेश तांबेकर याला आता अटक करण्यात तासगाव पोलिसांना यश आले असून तांबेकर याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.