प्रतिष्ठा न्यूज

पलूसकर विद्यालयाच्या वतीने क्षेत्रभेट – ग्रामीण रुग्णालय,स्वामी विवेकानंद वाचनालय, पलूस नगरपरिषद, हुतात्मा स्मारकास भेट

प्रतिष्ठा न्यूज
पलूस प्रतिनिधी : पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद वाचनालय, पलूस नगरपरिषद, हुतात्मा स्मारक, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी भेट दिली, सर्व कार्यालयांची माहिती, वाचनाचे महत्त्व , कामकाजाच्या पद्धती ,निसर्गात फिरण्याचा, क्षेत्रभेटीचा आनंद घेतला.

यावेळी मुख्याध्यापक तानाजी करांडे , क्षेत्रभेट विभाग प्रमुख बाळासाहेब चोपडे ,सुनिल पुदाले,साबीर शिकलगार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
सायकल चालवा आरोग्य सांभाळा , झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा, यासारख्या घोषणा देत जनजागृती केली.पलूस नगरपरिषद येथे मुख्याधिकारी निर्मला राशिनकर -यमगर यांनी विद्यार्थ्यांना. मार्गदर्शन केले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक सचिन तुपे, अमित शिंदे, यांच्यासह सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालय पलूस येथे डॉ बालाजी भिसे , डॉ. दीपक सरनाईक, नमिता सरनाईक, यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाची माहिती सांगितली. यावेळी सर्व डॉक्टर्स, परिचारिका,आशा स्वयंसेविका उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद वाचनालय पलूस येथे ग्रंथपाल सोपान डोंगरे, सौ. उमा पुदाले यांनी वाचनालयाविषयी माहिती दिली. यावेळी दैनिक पुढाऱीचे पत्रकार तुकाराम धायगुडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले.हुतात्मा स्मारक येथे या स्मारका विषयी माहिती बाळासाहेब चोपडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली. स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास सर्वांनी स्मरण करून आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे असे सांगितले

यावेळी बाळासाहेब चोपडे म्हणाले एक दिवस शाळा निसर्गाच्या सानिध्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. दररोज चार भिंतीच्या आत असणारी मुले क्षेत्रभेटीसाठी पलूस मधील विविध कार्यालयात नेलेमुळे विद्यार्थी भारावून गेले.मुलांना खूप आनंद झाला .मुलांनी या परिसरातील विविध माहितीचा आनंद घेतला.शाळेच्या चार भिंतीमध्ये मिळणारे शिक्षण, याबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात शिकायला खूप आवडते.त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, उपाध्यक्ष विश्वास रावळ, सचिव जयंतीलाल शहा, संचालक सुनील रावळ, सर्व संचालक, मुख्याध्यापक तानाजी करांडे , परिसरातील सर्व नागरिक, पालक, यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.