प्रतिष्ठा न्यूज

आरग गावातील प्रोग्रेस संस्थेची ५५ मुले खेळणार राज्यस्तरीय शालेय स्पर्धा

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
मिरज : प्रोग्रेस बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आरग व प्रोग्रेस कबड्डी क्लब आरग यांच्यावतीने दिवाळीचे औचित्य साधत ग्राउंड पूजन व शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा  सत्कार करण्यात आला. कबड्डी व रोल बॉल स्पर्धेत १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील ५५ मुले व मुली शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत खेळणार आहेत. ही मंडळाच्या दृष्टीने अभिमानाची बाब होती. ग्राउंड पूजनाच्या निमित्ताने ह्या खेळाडूंचा सत्कार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे तसेच आरग ग्रामपंचायतचे सरपंच बेडग ग्रामपंचायतचे सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संभाजी राजे पाटील बाजार समिती सभापती  बापूसो बुरसे तसेच आरग गावातील सर्व मान्यवर मंडळींनी मुलांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एस. आर. पाटील, अरुण गतारे, अनिल कोरबू, सर्जेराव खटावे, सुभाष खोत, तुकाराम गायकवाड गुरुजी, हरिभाऊ गावडे, किरण गायकवाड अशा अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रिडा शिक्षक आदिनाथ गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.