प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समीतीत बोनसच्या नावाखाली मोठा घोटाळा; शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर नेत्यांची दिवाळी : संचालक महादेवनाना पाटील

प्रतिष्ठा न्यूज/ किरण कुंभार
तासगाव : बाजार समिती फायद्यात आणण्यात कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो त्यामागे त्यांचे कष्ट असते, त्या कष्टाच्या बदल्यात त्यांना दिवाळी बोनस दिला जातो. मात्र या बोनसच्या वाटपात गफला करत संचालक व बाजार समितीच्या नेत्यांनी आपली घरे भरून दिवाळी साजरी केली काय, असा आरोप करत संचालक महादेव नाना पाटील यांनी नेत्यांना व संचालकांना कर्मचाऱ्यांच्या कष्टाची चाड असेल आणि नैतिकता असेल तर कर्मचाऱ्यांचे पैसे परत करावेत असे आवाहन केले. तासगाव बाजार समितीत कर्मचाऱ्यांच्या बोनस च्या नावाखाली तब्बल 17 लाख रुपयांचा चुराडा केला आहे. कर्मचाऱ्यांना बोनस द्यायचा आहे म्हणून पगाराच्या 20% रक्कम मंजूर करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना 10% रक्कमच देण्यात आली. उर्वरित रकमेपैकी 14  संचालकांनी प्रत्येकी 10 हजार रुपये दिवाळीचे पाकीट म्हणून घेतले.तर उरलेले जवळपास 7 लाख रुपये बाजार समिती चालवणाऱ्या नेत्याच्या घरात गेले. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून नेत्यांनी दिवाळी साजरी केली काय असा घनाघाती आरोप बाजार समितीचे संचालक महादेव नाना पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
बाजार समितीच्या बैठकित याबाबत चर्चा झाली होती, या पाकीट संस्कृतीला आम्ही विरोध केला होता,आमच्या गटाच्या चार संचालकांनी पाकीट घेतले नाही.पन पाकीट घेतल्यानंतर उरलेली 7 लाख रुपयांची रक्कम बाजार समिती चालवणाऱ्या नेत्याच्या घरात गेली,असून हें पैसे शेतकऱ्यांच्या कष्टाचे आहेत,2004 पासून बाजार समितीत हिच पद्धत आणि प्रथा सुरु असल्याचा आरोपहि यावेळी महादेव पाटील यांनी केला.यावेळी आर डी पाटील,अरुण खरमाटे,ऍड स्वप्नील पाटील,संभाजी चव्हाण,प्रताप पाटील, रवींद्र साळुंखे उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.