प्रतिष्ठा न्यूज

आर आर आबा कुटुंबियांवर अजित दादांची नाराजी…तर भाजपच्या प्रभाकर पाटील यांच्याशी संवाद…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हें काल विट्याचे आ.बाबर यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते.यावेळी पवार विट्यातून सांगलीकडे तासगाव मार्गे गेले.यावेळी पक्षातील गट बाजीमुळे तालुक्यातील शरद पवार गट आणि अजित दादा गट असे दोन गट वेगवेगळ्या ठिकाणी स्वागतासाठी उभे असलेले दिसून आले.प्रशासकीय कार्यपद्धतीचा गाढा अभ्यास, ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध घाला’ अशा कार्यशैलीसाठी प्रचलित असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या दौऱ्यात तासगाव राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील प्रमुख कार्यकर्त्यांन समोर आबा कुटुंबियां विषयी आपली नाराजी व्यक्त केली.येथील मार्केट यार्ड जवळ माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे,तालुका अध्यक्ष विश्वास पाटील,आणि इतर पदाधिका-यांनी दादांना गाडीतून उतरण्याची विनंती करून मार्केट यार्डात भेट देऊन आबांच्या पुतळ्याला हार घालून आमचा सत्कार स्वीकारा,अशी विनंती केली होती मात्र आपल्या गटात येण्यासाठी आबा कुटुंबीयांची वाट पाहणाऱ्या अजितदादांना आबा परिवाराचा सकारात्मक संदेश मिळाला नसल्याने दादांनी आपली नाराजी कार्यकर्त्यांना बोलून दाखवली.यावेळी आबांना उपमुख्यमंत्री,प्रदेशाध्यक्ष मी केले होते,आबांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत मि असताना तुम्ही माझी काय किंमत ठेवली असा सवाल करून गाडीतून उतरायला नकार देत  आपला राग व्यक्त करून उपमुख्यमंत्री अजित दादा यांनी तासगावात स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन न करता आणि कार्यकर्त्यांचा हार आणि पुष्पगुच्छ न स्वीकारता पुढे निघून जात त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दादांनी आपल्या गटाचे नव्याने नियुक्ती दिलेले साहेबराव पाटील आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि ताफा सांगलीच्या दिशेने रवाना झाला.यापूर्वी उपमुख्यमंत्री पवार अनेक वेळा तासगाव तालुक्यात येऊन गेले आहेत, परंतु राजकीय घडामोडी नंतर पहिल्यांदाच तें आले असल्याने या दौऱ्याकडे सगळयांनचेच लक्ष लागून होते.या सर्व घडामोडीत मात्र भाजपाचें युवानेते प्रभाकर बाबा पाटील यांच्याशी विटा नाका येथे गाडीतून उतरून त्यांच्याशी सवांद साधून बाबर कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी आलो असून पुष्पगुच्छ स्वीकारणे बरोबर नाही,मि पुन्हा तालुक्यात येणार असून आपल्याला ताकतीने महायुतीचंच कामं करायच असून येणाऱ्या सर्व निवडणुकात आपण एकत्रित कामं करूया असा शब्द देऊन अजित दादा यांनी प्रभाकर पाटील यांना ताकत देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.