प्रतिष्ठा न्यूज

मनोहर कुलकर्णी (संभाजी भिडे) यांच्या महाराष्ट्रात होणाऱ्या सभा रद्द करा : ऑल इंडिया पँथर सेना संघटना चिमूर, चे निवेदन

प्रतिष्ठा न्यूज / योगेश आगडे
चंद्रपूर : उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे – भिमा कोरेगाव दंगलीचा मास्टरमाइंड , मनोहर कुलकर्णी यांचे निवडणुकीच्या तोंडावर अचानक महाराष्ट्र राज्यात सभा सुरू झाल्या आहेत. हे राज्यसरकारच्या आशीर्वादाने सुरू आहेत की काय अशी शंका येते . भडकावू भाषण द्यायचं, धार्मिक दंगली, गडावरच्या दंगखोर म्हणून हा चेहरा महाराष्ट्र राज्यात परिचित आहे . महाराष्ट्रात भिडेंच्या सभा सुरू आहेत
ऑल इंडिया पँथर सेनाची मागणी आहे की , संभाजी भिडेच्या सभेवर कायमची बंदी घालण्यात यावी.

अमरावतीमध्ये महात्मा गांधीबद्दल केलेलं वक्तव्य आहे. त्या वक्तव्य बद्दल एफ आय आर दाखल झाली असून , अटक मात्र झाली नाही . मनुवादी प्रवृत्तीच्या भिडेला अटक करून अमरावती पोलीसांच्या ताब्यात देण्यात यावे.
मुख्यमंत्री असेल , गृहमंत्री असेल , कायद्याच्यावर कोणीही मोठा नाही. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे . कायदा व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखला पाहिजे ही पँथर सेनेची भुमिका आहे.
पोलिस भिडे ला पकडायला का घाबरतात !!?? हा आम्हाला प्रश्न पडतो. महाराष्ट्र ही महापुरुषांची भुमी आहे. अशा ठिकाणी भिडेंच्या सभा होवुन आणखी काही वक्तव्य केले तर शांततामय महाराष्ट्रातील परिस्थिती बिगडल्याशिवाय राहणार नाही. आता शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे . अर्धा महाराष्ट्र पुरात आहे . काही ठिकाणी पेरण्या सुद्धा झाल्या नाही . भिडे हे महाराष्ट्राचे आहे की नाही असा ही प्रश्न पडतो. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आली, व दिडसे लोकांची हत्या करण्यात आली आणि तेथील घर जाळण्यात आली आहे. म्हणून सुनियोजित पणे केंद्र आणि राज्य सरकारने या सगळ्या मुद्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी संभाजी भिडे चा वापर होत आहे. सरकारने संभाजी भिडे च्या सभेवर कायमची बंदी घालण्यात यावी. आणि कायमच तुरुंगात डांबण्यात यावे. अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना राज्यव्यापी आंदोलन छेडल्या शिवाय राहणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना ऑल इंडिया पँथर सेना तालुका अध्यक्ष आशिष बोरकर, तालुका उपाध्यक्ष जावेद पठाण , महासचिव तुळशीराम खोब्रागडे , पंकज गायकवाड , प्रदीप मेश्राम , रशियाजी पोपटे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.