प्रतिष्ठा न्यूज

कृषी सहाय्यक व सावकार औताडे सेवेतून निलंबित : मनसेच्या अमोल काळे यांचा दणका

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करत खाजगी सावकारी करणाऱ्या कृषी सहाय्यक दत्तात्रय औताडे याला सेवेतून निलंबित करण्यात आले.जिल्हा कृषी अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे.या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा मनसे नेते अमोल काळे यांनी करत सावकार औताडेला दणका दिला आहे.
यावेळी अमोल काळे यांनी सांगितले खाजगी सावकार औताडे याची तासगाव पूर्व भागात मोठया प्रमाणात खाजगी सावकारी आहे,खाजगी सावकारी करण्यासाठीचा पैसा हा कोल्हापूर जिल्ह्यात कृषी सहाय्यक असताना जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून त्याने ही माया जमवलेली आहे.
दहा कोटींहून अधिक रक्कम त्याने व्याजाने दिली आहे.याच पैशाच्या जोरावर काही गाव गुंडांच्या जीवावर सर्व सामान्य नागरिक,शेतकरी, शेतमजूर यांना धमक्या देत तो व्याजाचे पैसे वसुल करत होता. शासकीय सेवेत असताना त्याचा हा धंदा सुरू होता.याप्रकरणी मनसे नेते अमोल काळे यांनी कृषी सहाय्यक सावकार औताडे याला तातडीने निलंबित करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा कृषी अधिकारी यांना दिला होता.याची दखल घेत त्याला अटक केलेल्या दिवसापासून निलंबित करण्यात आले आहे.औताडे हा विटा बानुरगड येथे कृषी सहाय्यक म्हणून काम करत होता.महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ च्या पोट-नियम (१) व (२) अन्वये त्याला निलंबित करण्यात आले.

आर्थिक आमिषे व धमक्या
खाजगी सावकार व कृषी सहाय्यक औताडे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नेते अमोल काळे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा त्याला निलंबित करण्यापर्यंत केला मात्र दरम्यानच्या काळात त्यांना आर्थिक आमिशे मोठ्या प्रमाणात दाखवली. मात्र तरीही ते ऐकत नाहीत म्हणटल्यावर धमक्या देण्याचे प्रकार औताडे याने काही लोकांमार्फत केल्याचे काळे यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.