प्रतिष्ठा न्यूज

खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी समन्वय साधू – प्रांत अधिकारी समीर शिंगटे; शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांवर चौकशी करून कारवाई होणार, आंदोलक पत्रकारांना प्रांतांचे आश्वासन

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव, ता.30 (प्रतिनिधी) : गौण खनिज चोरांना तासगाव तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करून साथ देत आहेत. महसूल बुडवणाऱ्या चोरांना साथ देणे खपवून घेऊ नका स्वतः उतरुन चौकशी करा या मागणीसाठी तासगावात पत्रकारांच्या धरणे आंदोलनाला प्रांत समीर शिंगटे यांनी शुक्रवारी भेट दिली. खोटा गुन्हा रद्द करण्यासाठी मध्यस्ती करत गौण – खनिज उत्खननाची चौकशी करून  महसूल बुडवणाऱयांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलक पत्रकारांना दिले. यावेळी तासगाव तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकारांनी व संस्था संघटनांनी हजेरी लावत पाठिंबा दिला.

तासगाव तालुक्यात गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे वाभाडे  काढणारी लेखमाला दैनिक पुढारीने सुरू केली आहे. ही लेखमाला सुरू होताच तस्करांचे धाबे दणाणले आहेत. तर या तस्करांकडून हप्ते मिळवून आपले खिसे भरणाऱ्या महसुलाच्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे .

दरम्यान, ही लेखमाला सुरू करणाऱ्या पत्रकार दिलीप जाधव यांच्याविरोधात तस्करांनी खोटी तक्रार दिली आहे. या तक्रातीबाबत कोणतीही सत्यता पडताळून न पाहता  पोलिसांनीही जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. खोटा गुन्हा दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. याविरोधात तासगाव तालुक्यातील पत्रकार आक्रमक झाले आहेत. खोटी तक्रार दाखल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल व्हावा. तालुक्यातील गौण खनिज उत्खननाची चौकशी करावी या मागणीसाठी शुक्रवारी तासगाव तहसील कार्यालयासमोर धरणे  आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला प्रांत समीर शिंगटे,तहसीलदार रवींद्र रांजणे व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात तालुक्यात होणारे गौण खनिज उत्खननाची ‘ ईटीएस मोजणी करा, या मोजणीसाठी जिल्हाबाहेरील  पथकाची नेमणूक करा ,या मोजणी प्रक्रियेत पत्रकारांचा समावेश करा,  पत्रकार दिलीप जाधव यांचेवर दाखल झालेला खोटा एनसीआर रद्द करा तसेच एनसीआर नोंदवून घेणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस द्या, शासनाचा महसूल बुडवणाऱ्या तस्करांकडून वसुली करण्याची मागणी केली.

यावेळी प्रांत समीर शिंगटे यांनी एन सी आर मागे घेण्यासाठी दोन ते तीन दिवसात निर्णय घेत महसूल बुडावणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने पत्रकारांचे आंदोलन मंगळवारपर्यत स्थगित करण्यात आले.
यावेळी स्वागत प्रास्ताविक पत्रकार  संजय माळी यांनी केले, आभार विष्णु जमदाडे, बाबुराव जाधव, गजानन खुजट, ताजउद्दीन तांबोळी, विश्वास पाटील, तानाजी जाधव, ज्योतीराम जाधव, भाऊसाहेब मोहिते, यशवंत कदम, तुकाराम धायगुडे, विलास साळुंखे, पांडुरंग जाधव, शिवराज काटकर, कुलदीप देवकुळे, प्रविण शिंदे, चंद्रकांत क्षीरसागर, मिलिंद पोळ, विक्रांत पाटील, चंद्रकांत गायकवाड, विठ्ठल चव्हाण, रवींद्र माने, विनायक विभुते, संजय बनसोडे, गोरख चव्हाण, प्रदीप पोतदार, संग्राम कदम यांच्यासह 150 पत्रकारांनी उपस्तिथी लावली.

तासगांव तालुका पत्रकार संघाच्या धरणे आंदोलनाला मोठे यश!

तालुक्यात होणारे गौण खनिज उत्खननाची ‘ ईटीएस मोजणी सुरू ;तर या मोजणी प्रक्रियेत पत्रकारांचा समावेश करण्याची प्रांताधिकाऱ्यांची संमती व पत्रकार दिलीप जाधव यांचेवर दाखल झालेल्या NCR मागे घेण्यासाठी दोन ते तीन दिवसात निर्णय पत्रकारांचे आंदोलन मंगळवारपर्यत स्थगित आज दिवसभर तालुक्यासह जिल्हयातील सर्व पत्रकार व सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा.

यांनी दिला आंदोलनास पाठिंबा
या आंदोलनात सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, पलूस तालुका पत्रकार संघ, कडेगाव तालुका पत्रकार संघ, कवठेमंकाळ तालुका पत्रकार संघ, मिरज तालुका पत्रकार संघ, आटपाडी तालुका पत्रकार संघ, जत तालुका पत्रकार संघ व इतर सर्व पत्रकार संघटनांनी सहभाग घेऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील सामाजिक संघटना तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. यामध्ये शेतकरी संघटनेचे ज्योतीराम जाधव, राष्ट्रवादीचे अमोल शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप माने, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, खंडू पवार, शहराध्यक्ष  गजानन खुजट, भाजपचे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप माने, शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव जाधव, पांडुरंग जाधव, वंचित बहुजन आघाडीचे राजू मुल्ला, सनी गायकवाड, काँग्रेसचे रवींद्र साळुंखे, शिवसेनेचे शहराध्यक्ष विशाल शिंदे, काँग्रेसचे युवा नेते राजीव मोरे, मेंडपाळ आर्मीचे प्रमुख  अर्जुन थोरात, स्वप्नील जाधव, इंजीनिअर सुनिल माळी, मुन्ना कोकणे, प्रविण धेंडे, प्रकाश कांबळे, विकास डावरे यांच्यासह शेकडो  पदाधिकारी यांनी जाहीर पाठींबा दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.