प्रतिष्ठा न्यूज

तासगावचा श्रींचा रथोत्सव यावर्षी 8 सप्टेंबरला… यावर्षीच्या 245 व्या वार्षिक भाद्रपद गणेशोत्सवास प्रारंभ

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : प्रतिवर्षी प्रमाणे श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपर्यंत गणपती पंचायतन मधील पाचही देवतांच्या अनुष्ठानांना आज पासून प्रारंभ झाला.परंपरे नुसार आज  श्री गणपती मंदिरामध्ये उत्सवाच्या वातावरण निर्मिती व प्रसन्नतेला हातभार लावणाऱ्या अनुष्ठान वाहनाची व पुण्याह वाचनाचा पूजाविधी राहुल पटवर्धन यांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता संपन्न झाला.प्रमुख पौरोहित्य पंडित अनंतशास्त्री जोशी यांनी केले,यांच्यासह पंडित दीपक पांडुरंग जोशी,पंडित अथर्व अनंत जोशी,पंडित अजित कुलकर्णी,पंडित विजय कुलकर्णी,मल्हारी कुलकर्णी,शशिकांत कुलकर्णी,यांना विविध देव-देवतांच्या मंत्र पठनाची सुपारी देण्यात आली.सर्व गुरुजींना अनुष्ठानाच्या सुपाऱ्या देण्यात आल्या.संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या उत्सव म्हणजे तासगावचा रथोत्सव.आज रथगृहात रथ पुजन करून रथाची डागडुजी व रंगकामासाठी रथ बाहेर काढण्यात आला.आज सकाळी अनुष्ठान सुपारी देण्याच्या कार्यक्रमानंतर रथपूजन करून रथ बाहेर काढण्यात आला.या वेळी गणपती पंचायतन देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मा.राजेंद्र पटवर्धन सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली, विश्वस्त राहुल राजेंद्र पटवर्धन,देवस्थानचे जनरल मॅनेजर पवन सिंह कुडमल,सर्व पुजारी,रथाचे गती व दिशा दिग्दर्शनाचे रंगराव धोत्रे,संतोष धोत्रे,दत्ता जाधव आणि सर्व मानकरी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.